मिशन मजनूच्या सेटवर सिद्धार्थ मल्होत्रा झाला जखमी

मुंबई – अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या आगामी “मिशन मजनू’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सिद्धार्थ मल्होत्रा प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत साउथची अभिनेत्री रश्‍मिका मंदाना मुख्य भूमिका साकारत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

या चित्रपटातून साउथची सुपरस्टार रश्‍मिका मंदाना बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. तसेच अवॉर्ड विनिंग फिल्ममेकर शांतनु बागची हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. शांतनु बागची म्हणाले, संपूर्ण टीम सिद्धार्थसोबत शूटिंग आणि रोमांचक प्रवास करण्यास खूपच उत्साहित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

या चित्रपटात सिद्धार्थनं गुप्तहेराची भूमिका साकारली असून यामध्ये अनेक अॅक्शन सिन्स   आहेत. दरम्यान या चित्रपटातील एक अॅक्शन सीन करताना सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत  झाली आहे. मात्र दुखापतीनंतरही सिद्धार्थ मल्होत्राने आराम केला नाही. त्याने लगेच उर्वरित सीन पूर्ण केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा रॉ एजेंटची भूमिका साकारत आहे, जो पाकिस्तानमध्ये भारताचे गुप्त अभियानाचे नेतृत्व करत आहे. “मिशन मजनू’ हा 1970च्या दशकातील वास्तविक घटनेवर आधारित चित्रपट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच “शेरशाह’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीने मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यापासून दोघांच्या अफेयरची चर्चा सुरू होती. या दोघांना नुकतेच मालदिवमध्ये स्पॉट करण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.