बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांचे रिमेक करण्यात आले आहेत, तर काही चित्रपटांचे सध्या काम सुरू आहे. यात आता अमिताभ बच्चन यांच्या “आंखें’ या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दलही चर्चा सुरू आहे. आतापर्यंत या चित्रपटातील स्टारकास्टमध्ये अनेकांच्या नावांची चर्चा झाली आहे.
या चित्रपटासाठी प्रारंभी अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाची चर्चा झाली होती. यानंर सैफ अली खान आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्याही नावांचा उल्लेख करण्यात आला. आता अशी चर्चा आहे की, या चित्रपटात अमिताभसोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी बिग बीने होणार दर्शविला असून आता सिद्धार्थ मल्होत्राला अप्रोच करण्याचे निमार्त्यांकडून प्रयत्न सुरू आहे.
त्याने होकार दिल्यास “आंखे-2’मध्ये तो एका अंध व्यक्तीच्या भूमिकेत चाहत्यांना पाहावयास मिळेल.दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या आगामी “मिशन मजनू’ चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. याशिवाय तो “शेरशाह’मध्येही काम करणार असल्याचे समजते.
दुसरीकडे अमिताभ बच्चन सध्या “कौन बनेगा करोडपी-12’चे होस्ट करत आहे. याशिवाय ते लवकरच अजय देवगन याच्या “मेडे’ चित्रपटाचे काम सुरू करणार आहे. तसेच “ब्रह्मास्त्र’, “झुंड’ आणि “चेहरे’ चित्रपटातही अमिताभ बच्चन झळकणार आहे.