‘लग्नकल्लोळ’ चित्रपटासाठी सिद्धार्थचा नवीन लूक

मुंबई – मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप सोडणार अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव’ सध्या आपल्या जोरदार लूकमुळे देखील सोशल माध्यमांच्या लाइमलाईट असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची चर्चा सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे.

हा लूक त्याच्या ‘लग्नकल्लोळ’ या आगामी चित्रपटातील असून, सध्या सिद्धार्थचा हा लूक देखील सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल आहे. लग्नानंतरचे सुरुवातीचे नव्याचे नऊ दिवस संपले की, खऱ्या आयुष्याला सुरुवात होते.

याच संकल्पनेवर ‘लग्नकल्लोळ’ चित्रपट आधारित आहे. हा एक जबरदस्त असा, धमाल विनोदी चित्रपट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.