मुंबई : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या काही दमदार सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे हुप्पा हुय्या. हा सिनेमा मोठ्या प्रमाणात गाजला. तब्बल 15 वर्षांआधी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिद्धार्थ जाधव देखील त्यावेळी इंडस्ट्रीतील नवखा अभिनेता होता. तब्बल 15 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हुप्पा हुय्या 2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा हुय्या 2’ ची अधिकृत घोषणा केली आहे. पण हुप्पा हुय्या 2मध्ये प्रमुख भुमिकेत कोण असणार हे अद्याप समजू शकलेले नाही. सिद्धार्थ जाधवने पहिल्या सिनेमात दमदार अभिनय केला होता. सिद्धार्थने साकारलेला हणम्या लोकांना खूप भावला होता. दुसऱ्या भागातही सिद्धार्थच प्रमुख भुमिकेत असणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या सिनेमाच्या लेखनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कलाकार आणि तंत्रज्ञांची नावे जाहीर केली जाणार आहेत. हुप्पा हुय्या सिनेमात सिद्धार्थ जाधवबरोबर अभिनेके मोहन जोशी, उषा नाडकर्णी, गणेश यादव आणि गिरीजा ओक हे कलाकार प्रमुख भुमिकेत दिसले होते. या चित्रपटाची गाणी आजही प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसतात.