कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यां यांचे महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ झाला व्हायरल..

बंगळरू – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा, तसंच जाहीर धमकावल्याचा आरोप सिद्धरामय्या यांच्यावर होत आहे. याप्रकरणाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. याप्रकरानंतर भाजपने सिद्धरामय्या यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान,  सिद्धरामय्या हे एका कार्यक्रमानंतर लोकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी बसले होते. त्यावेळी एका महिलेने तक्रार सांगत असताना त्यांच्याशी वाद घातला. अनेकदा तक्रारी करूनही काहीच होत नसून त्यासाठी मला सारखे खेटे घालावे लागतात अशी त्या महिलेची तक्रार होती. ती महिला सारखा आपला मुद्दा रेटत असल्याने सिद्धरामय्यांचा तोल गेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनतर त्यांनी त्या महिलेला शांत राहा असं बजावलं आणि तिच्या हातातला माईक खाली खेचण्याचा ते प्रयत्न करू लागले.  हे करताना त्यांनी महिलेच्या अंगावरची ओढणीच हाताने खाली खेचली. सिद्धरामय्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

याप्रकरणी भाजपने काँग्रेसला घेरले असून काँग्रेसवर टीकास्त्र सुरू केले आहे.  भाजप सरकारमधील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे की, सिद्धरामय्या यांनी महिलेसोबत ज्याप्रकारे गैरवर्तन केले, तो एक अपराध आहे. यावरून स्पष्ट होते की महिलाचां  किती सन्मान करतात.  त्यामुळे राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे की, आता ते  सिद्धरामय्यावर काय कारवाई करणार.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/341495693362658/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)