मध्यप्रदेश – राज्यातील विदिशा जिल्यातील गंज बासौदा भागात सयामी जुळे जन्मला आले आहे. ज्याने डॉक्टर देखील हैराण झाले आहेत.
सूत्रांच्या माहिती नुसार, रविवारी 21 वर्षीय बबीता अहिरवार यांनी या बाळाला जन्म दिला असून, बाळा ला दोन डोकी आणि 3 हात आहेत. तसेच बाळाला केवळ ह्रदय एक आहे. याशिवाय एकाच हाताला दोन तळहात आहेत.
दरम्यान, डॉक्टरांचे म्हणणे आहे की जिवित राहणे आणि सामान्य आयुष्य जगणे अवघड आहे. विदिशामधील हे असे पहिलेच प्रकरण आहे.
सर्वसाधारणपणे असे तेव्हा होते जेव्हा भ्रूण व्यवस्थित विकसित होत नाही. ही स्थिती लाखांमध्ये एकदा येते. सध्या नवजात बाळ आणि आई आयसीयूमध्ये आहेत.