Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. वयाची चाळीशी ओलडल्यानंतरही तिच्या दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करतात. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ती आपल्या कामाबाबतच्या अपडेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. यातच आता श्वेता पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझी भूमिका असलेल्या आगामी हिंदी कॉमेडी नाटक “एक मैं और एक टू” ची घोषणा करताना आनंद होत आहे. हसण्यासाठी आणि भावनांच्या रोलरकोस्टरसाठी सज्ज व्हा,” असे तिने म्हंटले आहे. Shweta Tiwari |
View this post on Instagram
श्वेता तिवारी एक नवीन नाटक करणार आहे. त्याचे नाव ‘एक मैं और एक टू’ असे आहे. हे एक विनोदी नाटक आहे. ज्याचा प्रीमियर 6 जुलै रोजी सेंट अँड्र्यू येथे 7:30 वाजता आणि 7 जुलै रोजी रंगशारदा येथे संध्याकाळी 7:00 वाजता होणार आहे.
श्वेताने याचे पोस्टर देखील शेअर केले आहे. सध्या तिच्या या नव्या शोसाठी चाहते देखील उत्सुक आहेत.”एक मैं और एक टू” या हिंदी कॉमेडी नाटकांमध्ये श्वेता तिवारीसहश्वेता गुलाटी, किश्वर मर्चंट, सिद्धार्थ सागर , सुरेश मेनन, नासिर वॉकर हे कलाकार देखील असणार आहेत. Shweta Tiwari |
श्वेता तिवारीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कसौटी जिंदगी के’ मधील प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारून तिने घराघरात आपले नाव कमावले. ‘मैं हूं अपराजिता’ने तिने रातोरात प्रसिद्धी मिळवली. श्वेताने सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ जिंकला होता.