श्‍वेता बसु आणि रोहित मित्तल झाले विभक्‍त

मुंबई – श्‍वेता बसु आणि रोहित मित्तल यांनी विभक्‍त झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या वर्षीच 13 डिसेंबरला या दोघांचे लग्न झाले होते. आता लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसापूर्वीच त्यांचे वैवाहिक आयुष्य समाप्त झाल्याची बातमी आली आहे. दोघांनी सामोपचाराने विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्‍वेता बसुने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेक महिने विचार केल्यानंतर दोघांनी हा निर्णय घेतल्याचेही तिने म्हटले आहे.

प्रत्येक पुस्तक त्याचे मुखपृष्ठ बघूनच वाचले जावे, हे काही आवश्‍यक नाही. याचा अर्थ पुस्तक चुकीचे आहे आणि हे पुस्तक वाचायला नको, असे अजिबातच नाही. काही गोष्टी अर्धवटच सोडलेल्या चांगल्या असतात, असे तिने म्हटले आहे.

खूप चांगले क्षण घालवल्याबद्दल तिने रोहितला धन्यवादही दिले आहेत. आपले पुढील आयुष्य एन्जॉय कर, अशा शुभेच्छाही तिने रोहितला दिल्या आहेत. लग्नापूर्वी चार वर्षे श्‍वेता बसु आणि रोहित मित्तल एकमेकांना डेट करत होते. रोहित मित्तल हा डायरेक्‍टर आहे, तर श्‍वेता बसु ही अनुराग कश्‍यपची प्रॉडक्‍शन कंपनी फॅंटममध्ये स्क्रीप्ट कन्सल्टंट म्हणून काम करत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.