कराड – कराड तालुक्यासह शहराजवळच्या आगाशिवनगर परिसरात करोनाबाधित रूग्ण सापडल्याने प्रशासनाने निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेत दि. 23 पासून 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केला. कराड शहराचा पूर्ण भाग, मलकापूरसह परिसरातील अकरा गावांमध्ये हा शंभर टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. सकाळच्या वेळेत काही जणांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना पोलिसांच्या दंडुका सहन कराव्या लागल्या.
करोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले होते. परंतु त्याची झळ कराड तालुक्यात पोहचली नसल्याने नागरिकांना त्याचे गांभीर्य वाटत नव्हते. तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात आलेले पुणे-मुंबईकर सुट्टीची मजा लुटण्यात दंग आहेत. पार्ट्या करणे, गाड्यांवरून मनसोक्त फिरणे हाच त्यांचा रोजचा उद्योग चालू आहे. करोना आपल्याकडे काही येत नाही अशा भ्रमात असणाऱ्या पुणे-मुंबईकर नागरिकांमुळे इतर स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
सध्या करोनाबाधित असणाऱ्यांमधील नागरिक हे जादा करून पुणे-मुंबई येथून आलेले आहेत. त्यांनाच प्रथम करोनाची बाधा झाली असून त्यांच्यामुळे आता स्थानिकांनाही त्याची झळ बसू लागली आहे. प्रशासन ओरडून सांगत असतानाही नागरिकांना त्याचे काही देणेघेणे नसल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे कराड तालुक्यात करोना थैमान घालू लागला आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी प्रत्येकाने घरीच थांबणे गरजेचे आहे.
तालुक्यात वाढत असलेली करोनाची साखळी तोडता यावी यासाठी प्रशासनाला कडक निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता. परिणामी प्रशासनाला दि. 23 पासून अनिर्णित लॉकडाऊन जाहीर करावा लागला. त्यामुळे सकाळचा वेळ सोडता कराड, मलकापूरसह संपूर्ण अकरा गावांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. अत्यावश्यक सेवेत फक्त नगरपालिका, पोलीस व दवाखाने यानांच परवानगी देण्यात आली आहे. पोलीस, पेट्रोल पंपाव्यतिरिक्त एकही पेट्रोलपंप सध्या सुरू नाहीत. शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांवर बॅरिगेटस् लावण्यात आले आहेत.
नागरिकांनीही कोठूनही बाहेर पडू नये असे नियोजन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास कराड तालुका करोनामुक्त होण्यास मदत होऊ शकेल. त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या गावांमध्ये आहे. लॉकडाऊन कराड शहराचा पूर्ण भाग, मलकापूर नगरपरिषद क्षेत्र, कोयनावसाहत, कापिल, गोळेश्वर, कार्वे, नांदलापूर, जखिणवाडी, बनवडी, सैदापूर, ओगलेवाडी, गोटे, मुंढे, वारूंजी आदी गावे कराड शहरानजीक असल्याने या गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळणे गरजेचे…
कराड तालुक्यात करोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. परिणामी कराड तालुका हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यात सुरू झालेली करोनाची साखळी तोडायची असेल तर प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळणे गरजेचे आहे. परंतु गुरूवारी सकाळच्या वेळेत काही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसले. पालकमंत्र्यांनी केली पाहणी..
कराड तालुक्यात करोना बधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून कडक पाऊले उचलत कराड शहर व परिसर 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आला आहे. हॉस्पिटल व्यतिरिक्त कोणतीही सुविधा सुरू नाही. या पार्श्वभूमीवर कराड शहराच्या संपूर्ण परिस्थितीची पाहणी सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याशी संपूर्ण परिस्थितीबाबत व अडचणींबाबत चर्चा केली.
पालकमंत्र्यांनी केली पाहणी..
कराड तालुक्यात करोना बधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून कडक पाऊले उचलत कराड शहर व परिसर 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आला आहे. हॉस्पिटल व्यतिरिक्त कोणतीही सुविधा सुरू नाही. या पार्श्वभूमीवर कराड शहराच्या संपूर्ण परिस्थितीची पाहणी सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याशी संपूर्ण परिस्थितीबाबत व अडचणींबाबत चर्चा केली.