– पुन्हा हजर होत असलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या नगरमध्ये हजर होण्याच्या आधीची जिल्हा क्रीडा कार्यालयातील कर्मचारी सामुहिक रजेवर गेल्याने नावंदे एकाकी पडल्या आहेत. नावंदे यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, खेळ संघटना, मुख्याध्यापक महासंघ, माध्यमिक शिक्षक संघटना उभ्या ठाकल्या.
तब्बल दीड महिना शालेय स्पर्धा मनुष्यबळा अभावी स्थगित कराव्या लागल्या होत्या. त्यावेळी जिल्ह्याचा असहकार होता. आता मात्र नावंदे यांचे कार्यालयातीलच कर्मचारी सामुहिक रजेवर गेल्याने आंदोलनाला नवीन निर्णायक वळण मिळाले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे आज दुसऱ्या दिवशी देखील कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला दरम्यान क्रीडा संघटनांचा स्पर्धेवर बहिष्कार असून असं कायम आहे असे प्राध्यापक सुनील जाधव यांनी सांगितले.
त्यामुळे कविता नावदें एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले. यांच्याविरोधात ऑगस्टमध्ये संघटनांनी केली होती त्यानंतर संघटनांनी केली होती चौकशी सुरू असताना पुन्हा नियुक्ती कशी केली असा सवाल त्यांनी केला संघटना एकत्र आल्या होत्या त्यांनी तात्काळ बदली करावी अशी मागणी आशिष शेलार यांची भेट घेऊन केली होती त्यावेळी त्यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात आली होती.
नावंदे यांनी गुरुवारी नगरमध्ये पदभार स्वीकारला क्रीडा संघटनांमध्ये असताना या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही कर्मचारी सामुहिक रजेवर आहेत कार्यालयात कर्मचारी उपस्थित होते. समन्वय समिती सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून मार्गक्रमण करत असून स्थगित केलेला क्रीडा कार्यालयाशी असहकार पुन्हा चालू करत असल्याचे समन्वय समितीच्या बैठकीत एकमताने ठरले. तसेच चुकीच्या मार्गाने पुन्हा झालेली नियुक्ती, शिक्षकांचा असहकार व आता क्रीडा कार्यालयातील कर्मचारी यांनी सामुहिक रजा टाकून पुकारलेला असहकार यामुळे सत्यशोधले जाईल.