हैदराबाद – न्यूझीलंडविरुद्धच्या द्विशतकी खेळीनंतर शुभमन गिलने आपल्या यशाचा खुलासा केला आहे. समोरून फलंदाज बाद होत असल्याने दडपण तर येत होते मात्र, तरीही खराब चेंडूंवर आक्रमण करण्याची एकही संधी सोडली नाही. चौकार व षटकार फटकावल्यामुळे आत्मविश्वासही उंचावला व ही मोठी खेळी साकार झाली, अशा शब्दांत गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ईशान किशनच्या ‘त्या’ कृतीवर सुनील गावसकरांनी व्यक्त केलाय संताप, म्हणाले…
लॉकी फर्ग्युसनसह अन्य गोलंदाजांनी डावाच्या सुरुवातीलाच यष्टीबाहेर सातत्याने चेंडू टाकले व त्यावर मला चौकार मिळाले. तसेच दडपण येत असतानाही षटकार मारल्याने माझ्यावरचे दडपणही दूर होत गेले. हेनरी शिप्ले व मिचेल सॅंटनर यांच्या गोलंदाजीवर धावा काढणे कठीण होत होते. मात्र, त्यांनीही सुरुवातीच्या षटकांनंतर खराब चेंडू टाकल्याने माझाच लाभ झाला, असेही गिल म्हणाला.
मला या खेळात कारकीर्द करण्यासाठी माझ्या वडिलांनी पाठिंबा दिला तो महत्त्वाचा होता.
कुस्तीपटूंच्या आरोपांबाबत तीन दिवसांत स्पष्टीकरण द्या; क्रीडा मंत्रालयाचे आदेश
त्यामुळेच मी अशी खेळी साकार करू शकलो. लहानपणापासूनच माझे देशासाठी खेळण्याचे स्वप्न होते व त्याची पूर्तताही घरच्या पाठिंब्यामुळे पूर्ण झाली. माझ्या खेळीने संघाला मोठी धावसंख्या उभारता आली याचे समाधान जास्त आहे. मात्र, तरीही मायकल ब्रेसवेलने केलेली 140 धावांची खेळी तितकीच महत्त्वाची होती. तो खेळपट्टीवर असेपर्यंत त्यांना विजयाची संधी होती. मात्र, अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरने यॉर्कर चेंडूवर त्याला बाद केले व आमचा विजय निश्चित झाला याचा आनंद सर्वाधिक आहे, असेही गिलने म्हटले.
युवराजकडून मोलाचे मार्गदर्शन
भारतीय संघाचा सिक्सरकिंग युवराज सिंग हे माझे मेंटॉर आहेत. त्यांनी वेळोवेळी मला अनेकदा सल्ला दिला आहे. त्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो. जेव्हा मला संघात संधी मिळत नव्हती तेव्हाही त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला. जेव्हा संधी मिळेल तेव्हा नैसर्गिक खेळ कर व कोणतेही दडपण न घेता फलंदाजी कर, असा त्यांनी दिलेला सल्ला हेच माझ्या यशाचे रहस्य आहे, असेही गिलने सांगितले.