‘श्रुती मराठे’चे साडीतील ‘हे’ फोटो पाहून फॅन्स म्हणाले.. “डायरेक्ट काळजात’

साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री श्रुती मराठे

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ मधून अभिनेत्री ‘श्रुती मराठे’ महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली आहे. मराठी सिनेविश्वातील बोल्ड अँड ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून श्रुतीला ओळखले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrutii Marrathe (@shrumarathe)

श्रुतीचा जन्म ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला. मॉडेलिंगपासून करीअरची सुरुवात करणाऱ्या श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकर सोबत 2016 साली विवाह केला. सध्या श्रुती महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrutii Marrathe (@shrumarathe)

श्रुती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या लाजवाब अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ भाषेतील ‘इंदिरा विजहा’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrutii Marrathe (@shrumarathe)

सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असणारी श्रुती आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सतत आपल्या फॅन्ससह शेअर करते असते. नुकतेच श्रुतीने राणी कलरच्या सिल्क साडीतील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. श्रुतीच्या या फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrutii Marrathe (@shrumarathe)

श्रुती च्या चेहऱ्यावरील स्मित हास्य नेहमीच रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आले आहे. म्हणूनच श्रुतीचे फॅन्स तिच्या व्हिडिओ आणि फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करतात. श्रुती कोणत्याही रंगाच्या साडीत अतिशय ग्लॅमर आणि मादक दिसत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrutii Marrathe (@shrumarathe)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.