पुणे- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे आयोजित ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात शनिवारी (18 सप्टेंबर) “नव्या सुरांची, नवी पर्वणी’ रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
या महोत्सवात रसिकांना विविध कलाप्रकारांचा आस्वाद घेता येत आहे. तसेच, शनिवारी (18 सप्टेंबर) लोकप्रिय गाण्यांची नव्या दमाच्या गायकांनी केलेली नवी मांडणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
“मेहफिल अनलॉक’ या कार्यक्रमात गायक हृषिकेश रानडे, विश्वजित बोरवणकर, गायिका आनंदी जोशी, प्रियांका बर्वे सहभागी होणार आहे. तर, पूर्वी भावे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. ट्रस्टच्या www.bhaurangari.com या संकेतस्थळावर कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.