‘पुणे ग्रामीण’या नावात शिक्रापूर पोलिसांकडून बदल

अखेर बहुचर्चित बॅरिकेट्‌सची दुरुस्ती

शिक्रापूर – येथील पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त व नाकाबंदीसाठी वापरण्यात येणाऱ्या एका बॅरिकेट्‌सच्या फोटोने पुणे जिल्ह्यासह इतर ठिकाणी धुमाकूळ घालत त्या बॅरिकेट्‌सवरील नाव वाचून दाखविणाऱ्यास एक लाख रुपयांहून अधिक बक्षीस देण्याचे जाहीर झाल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती. “शिक्रापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण’ असे नाव झालेले होते.

याबाबतची बातमी “प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर अखेर या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी नावात दुरुस्ती करीत सोशल मीडियाच्या चर्चेवर पडदा टाकला आहे. पोलिसांनी त्या बॅरिकेट्‌सचा शोध घेत तातडीने त्यावरील “पणुे ग्रामीण नावा’चे “पुणे ग्रामीण’, असे नाव केले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनला बंदोबस्त तसेच नाकाबंदीसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅरिकेट्‌सची संख्या कमी असल्याने काही कंपनी व सामाजिक संस्थांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला बॅरिकेट्‌स भेट दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.