श्रीगोंदा नगरपरिषद : भाजपला सर्वाधिक जागा,मात्र नगराध्यक्षपद ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ कडे

श्रीगोंदा नगरपरिषद सविस्तर निकाल – एकूण जागा 19.
भाजप – 11, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 8.
नगराध्यक्ष शुभांगी पोटे (काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी)

अहमदनगर – जिल्ह्यातील श्रींगोदा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा आज मतमोजणी संपली. या निवडणूकीत भाजप पक्षाने 11 जागेवर विजय मिळवला तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 8 जागेवर विजय मिळवला आहे.

भाजपने 11 जागा जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे विजयी झाल्या आहेत. काल (27 जानेवारी) श्रींगोदा नगरपरिषदेसाठी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगराध्यपदासाठी भाजपकडून सुनीता शिंदे, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शुभांगी पोटे आणि संभाजी ब्रिगेडकडून सिराबजी कुरेश या निवडणूकीच्या रिंगणात होत्या. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुंभागी पोटे यांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे मलकापूर जि. सातारा नगरपरिषद निवडणूकीत काँग्रेसचा बहूमताने दणदणीत विजय मिळवला. याठिकाणी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या नीलम धनंजय येडगे यांनी नगराध्यपदी विजय प्राप्त केला.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)