जामखेड (प्रतिनिधी) – हर हर महादेवाच्या जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात शनिवार (दि. 25) मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत श्री नागेश्वर पालखी सोहळा पार पडला.
जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वरची नागपंचमीनिमित्ताने यात्रा असते. मात्र यावर्षी करोनाचे संकट असल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. नागेश्वर मंडळाने मोजक्या लोकांच्या उपस्थित हा उत्सव करण्याचे ठरविले. शनिवारी सकाळी यजमान जामखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर व त्यांच्या पत्नी कविता निमोणकर यांच्या हस्ते श्री नागेश्वराची विधिवत पूजा व आरती नागेश्वर घायाळ गुरुजी, लक्ष्मीकांत काळे गुरुजी व गौरव घायाळ यांनी केली.
श्री नागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला. नंतर हरहर महादेवाच्या व ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी, पूजा आटोपून पुन्हा गाभाऱ्यामध्ये नागेश्वराचा मुखवटा ठेवण्यात आला व मंदिर बंद करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी मंदिदादासाहेब महाराज सातपुते, सीताराम राळेभात, हरिदास गुंड, शेषेराव मुरूमकर, संतोष बारगजे या मोजक्या मंडळीने अभंग, गवळणींचे सुमधुर गायन केले. श्री नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रह्मे, दिलीपकुमार राजगुरू, शंकर राऊत, महादेव पानसांडे, पांडुरंग भोसले यांनी गर्दी होऊ नये म्हणून मंदिरा बाहेरून बंदोबस्त ठेवला होता.