वाघोली – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असणाऱ्या श्री. क्षेत्र तुळापुर साठी लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक
पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादीचे युवा नेते प्रदीप वसंत कंद यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला असून श्री क्षेत्र तुळापूर येथील भेटीत नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते रंगनाथ शिवले, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा लोचन शिवले, सरपंच कुंपाताई इंगळे, माजी सरपंच गणेश पुजारी, उपसरपंच नवनाथ शिवले, राष्ट्रवादी पुणे जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष विजय वाळुंज, शांताराम बापू शिवले,
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संतोष शिवले, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शिवले, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष योगेश शिवले, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस
अक्षय शिवले, पवन खैरे, हनुमंत शिवले, लोणीकंद ग्रामपंचायत सदस्य रुपेश गावडे, शामराव खलसे, आप्पासाहेब जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते.