तळेगाव ढमढेरे (वार्ताहर)- विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे एक करोना संशयित मुलगी आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी संपुर्ण गाव बंद केले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावातील प्रत्येक घरी जाऊन सर्व्हे करण्याचे काम जोमाने सुरु करण्यात ठेवले आहे.
विठ्ठलवाडी येथील एका महिलेच्या संपर्कात आलेल्या लहान मुलीचे खासगी हॉस्पिटलमध्ये केलेले करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यकरोना बाधित क्षेत्राच्या तीन किलोमीटरच्या आतील परिसरात येणाऱ्या गावठाण, शिंदे मळा, चक्रपाणी नगर, महानुभाव मळा, भोसे वस्ती, मिरगव्हाण, डॅम वस्ती, वेगरे पुनर्वसन, डाल वस्ती, चोरमले वस्ती, कोल्हेमळा या भागात सर्वेक्षण सुरु करण्यात ांनतर गावामध्ये संपूर्ण गाव व रस्ते बंदचा निर्णय घेण्यात आला व आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यास सुरवात झाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावातील आले आहे.
प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्वेक्षण करून नागरिकांची माहिती घेतली जात आहे, यादरम्यान प्रत्येक घरातील लहान मुले, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक यांचे उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्दी, खोकला, ताप याची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दररोज अहवाल पाठविला जात आहे. अशा प्रकारची कार्यवाही यापुढे देखील चौदा दिवस राबविली जाणार आहे.
विठ्ठलवाडी येथे नऊ टीमद्वारे तीन आशा स्वयंसेविका, चार अंगणवाडी सेविका, एक मदतनीस, आठ शिक्षक, दोन आरोग्य सेवक असे एकूण 18 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 708 कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू आहे. 3 हजार 492 एवढी लोकसंख्या आहे. गावातील 36 जणांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
विठ्ठलवाडीत 700 मास्क वाटप
विठ्ठलवाडी येथे माजी सरपंच अलका राऊत यांच्यावतीने 700 मास्कचे वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक वॉर्डमध्ये प्रथम पाऊल उचलून मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच वार्डमध्ये किटनाशकची फवारणी करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमास उपसरपंच बाबाजी गवारे, माजी ग्रा पं. सदस्य माऊली राऊत, सुजाता शेलार आणि के. टी कोतवाल यांचे सहकार्य लाभले.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे तीन दिवसांपासून सर्व्हेक्षण सुरू आहे दवसांमध्ये एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून बाहेर गावाहून आणि परदेशातून कोणी नवीन व्यक्ती आली आहे का? याबाबत माहिती कुटुंब प्रमुखांकडून घेतली जात आहे.
– डॉ. प्रज्ञा घोरपडे, वैद्यकीय अधिकारी