कोरेगाव भीमा – स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी प्रतिवर्षीसाठी मिळणारा निधी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीस देण्यात आल्याने सरपंच सारिका अंकुश शिवले यांनी आमदार महेश लांडगे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे आभार मानले.
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास राज्यभरासह देशभरातून शंभू भक्त मोठ्या संख्येने येत असतात. यावेळी पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. परिसर सुशोभीकरण, स्वच्छता व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. याबाबत आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते व त्याचे पालन करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आमदार महेश लांडगे यांचे आभार मानले.
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी प्रतिवर्षीसाठी मिळणारा निधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून निधी मंजूर होऊन दिनांक १६ मे रोजी २ लाख ९९ हजार रुपयांचा धनादेश (चेक) भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या विशेष प्रयत्नातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी साठी दरवर्षी २९,९००० रुपये देण्याचे मंजूर केले आहे.
आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी या आठवड्यात वेळ मिळवण्याचा प्रयत्न करतो तसेच दोन दिवसात जिल्हाधिकारी यांच्याशी मीटिंग करू तसेच आराखड्याबाबत सकारात्मक काम करूयात असे आश्वासन दिले. यावेळी आमदार महेश दादा लांडगे, माजी सरपंच अंकुश शिवले, उपसरपंच राहुल कुंभार ,माजी उपसरपंच संतोष शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे, कृष्णा आरगडे ग्राम विकास अधिकारी शंकरराव भाकरे माजी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण शिवले, अशोक फरताळे उपस्थित होते.