बारामती – तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ… हे ब्रीद घेऊन “श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ बारामती गेली सात वर्षे “आयव्हीएफ’च्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांच्या आयुष्यात मातृत्व स्वप्नपूर्ती साकारत आहे.
डॉ. आशिष जळक यांच्या प्रयत्नांतून सुमारे चार हजार पेक्षा अधिक रुग्णांच्या आयुष्यात गेल्या आठ वर्षांत “टेस्ट ट्यूब बेबी’च्या माध्यमातून यश आलेले आहे. त्यांचे मातृत्वाचे स्वप्न साकारले आहे. या निमित्ताने बारामतीचे नाव “आयव्हीएफ’च्या बाबतीत जागतिक नकाशावर गेलेले आहे. बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राचा नावलौकीकही यामुळे उंचावल आहे.
आर. आय. विटनेस प्रणाली, ब्लास्टोसिस ट्रान्सफर, लेझर हॅचिंग यांसारख्या जागतिक दर्जाच्या “आयव्हीएफ’मधील सुविधा देणारे पश्चिम महाराष्ट्रातील “श्री चैतन्य’ हे एक अग्रगण्य “टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ ठरले आहे. डॉ. आशिष जळक हे सामान्य परिस्थिती असलेल्या घरातून आल्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात पैशामुळे उपचार झाला अशी अडचण त्यांनी कधीच येऊ दिली नाही. यावर्षी देखील “आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त 75 लकी जोडप्यांचा आयव्हीएफ मोफत करण्याचा संकल्प “श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ने केला आहे.
टेस्ट ट्यूब बेबीद्वारे चार हजारपेक्षा अधिक रुग्णांना दिले आईपण
* आतापर्यंत 4 हजारांवर जोडप्यांना अपत्यप्राप्ती
* 70 टक्के यश देणारे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक यशस्वी सेंटर
* 2021 मध्ये 31 तर 2022 मध्ये 101 जोडप्यांना मोफत
* टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची संकल्पना
* पहिल्यांदा टेस्ट ट्यूब बेबी अयशस्वी झाल्यास दुसऱ्या उपचारासाठी निम्मा खर्च
* दुसऱ्यांदा अयशस्वी झाल्यास तिसराउपचार मोफत
* “एम्स’मधून प्रशिक्षण घेतलेले निष्णात वैद्यकीय तज्ज्ञांमुळे सेंटरकडे ओघ
व्यावसायिकतेपेक्षाही अपत्यप्राप्तीला…
वंध्यत्वनिवारण होऊन जेव्हा जोडप्याला अपत्यप्राप्ती होते, त्या वेळेस त्या कुटुंबात निर्माण होणारा आनंद हा सर्वाधिक महत्वाचा वाटतो. लग्नानंतर अपत्यासाठी आसुसलेले दांपत्य जेव्हा चिमुकल्या बाळाला हातात घेतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान वेगळा आनंद देणारे असते. श्री चैतन्य टेस्टट्यूब बेबी सेंटरमध्ये या बाबत मोफत मार्गदर्शन शिबीरांचे सातत्याने आयोजन केले जाते. अत्यल्प खर्चात ही प्रक्रीया पार पाडली जाते. दोन चाचण्या अपयशी ठरल्या तर पुढील चाचण्या मोफत केल्या जातात.
वंधत्वनिवारणासाठी…
काही शास्त्रीय तपासण्या कराव्या लागतात. महिला व पुरुषांसाठी त्या स्वतंत्र असतात. कोणी काहीही सांगितले तरी जोपर्यंत अचूक तपासणी होऊन नेमके निदान होत नाही तो वर काहीही सांगणे योग्य नसते. महिलांमध्ये गर्भनलिका तपासणी, हार्मोन्सची तपासणी गरजेची असते तर पुरुषांमध्ये वीर्याची तपासणी करावी लागते. अपत्यप्राप्तीच्या दृष्टीने या तपासण्या गरजेच्या असतात, त्यामुळे मनामध्ये संकोच किंवा भीती न बाळगता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करून घ्याव्यात, अशी माहिती डॉ. प्रियंका आशिष जळक यांनी दिली.
टेस्टट्यूब बेबी कोणाला उपयुक्त ठरते
अनेकदा वाट बघूनही अपत्यप्राप्ती होत नाही. वय वाढून जाते, अशा वेळेस महिलेचे वय जास्त असणे, गर्भनलिका बंद असणे, स्त्री बिजाची पुरेशी वाढ न होणे किंवा स्त्रीबिजाची कमतरताच असणे, गर्भाशयात गाठी असणे, वारंवार गर्भपात होणे अशा समस्यांमुळे महिलांमध्ये नैराश्य येते; मात्र अचूक निदान व तपासणी झाल्यानंतर टेस्ट ट्यूब बेबी हे अशा जोडप्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदानच ठरू शकते. नैराश्य झटकून स्त्रियांनी याचा विचार करायला हरकत नाही.
101 लकी जोडप्यांवर मोफत उपचार
टेस्ट ट्यूब बेबी म्हटले की त्यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च आणि आर्थिक बोजाने आर्थिक कंबरडे मोडायची भीती यामुळे लोक टेस्ट बेबीच्या उपचारापासून वंचित राहत होता. ही बाब लक्षात घेत विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार “श्री चैतन्य मातृत्व योजना 2022′ सुरू केली. या योजनेअंतर्गत सर्वप्रथम 101 लकी जोडप्यांचे “आयव्हीएफ’ उपचार मोफत होणार आहेत. या उपक्रमासाठी सुमारे 80 लाख रुपयांचा खर्च बारामतीचे “श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर’ स्वतः रुग्णांसाठी उचलणार आहे. केवळ कमी खर्चात उपचार न देता जागतिक दर्जा सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील “श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर’ने केला आहे.