श्रेयसच्या खांद्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया

मुंबई – भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या खांद्यावर येत्या गुरुवारी म्हणजेच 8 एप्रिलला शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शस्त्रक्रियेमुळे श्रेयसला आगामी आयपीएल स्पर्धेत खेळता येणार नसून त्याला पुढील चार महिने पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी विश्रांती घ्यावी लागणार आहे.
पुणे येथे 23 मार्चला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयसला दुखापत झाली.

शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोने फटकावलेला चेंडू झेप घेऊन अडवण्याच्या प्रयत्नात श्रेयसचा खांदा दुखावला. आता 8 एप्रिलला श्रेयसची शस्त्रक्रिया होणार असून, त्यानंतर किमान चार महिने त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.