Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

श्रावण स्पेशल : श्रावणातील दिवस…

by प्रभात वृत्तसेवा
August 16, 2021 | 8:20 am
A A
सजवीत असतो भुवन!!

 

पाऊस पडून गेल्यावर धरणी चिंब भिजून जाते. पाणी पिऊनिया राने तृप्त झाली, हिरवा शालू नेसुनी वसुंधरा साज सजली. वसुंधरा नटूनथटून नववधूसारखी भासत आहे. हिरव्या पाचूच्या दागिन्यांनी ती मढली आहे. केसांत रंगीबेरंगी फुलांचा गजरा माळला आहे. असा सुखसोहळा श्रावणमासात साजरा होतो. श्रावण महिना म्हणजे निसर्गातील पवित्र ऋतू.

सणांची रेलचेल, पूजापाठ, उपवास, आरत्या, व्रतवैकल्ये असे वातावरण सर्वांना प्रसन्न ठेवते. “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमाली’चे असे श्रावणाचे वर्णन एका ज्येष्ठ कवींनी केले आहे. निसर्गातील सतेजपणा, पानांची कोवळीक, फुलांचे बहरणे, झऱ्यांची खळखळ अशा वातावरणात श्रावण आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून देतो. श्रावणात अनेक ऋषीमुनींनी साधना केली असावी, कित्येक पवित्र कार्य श्रावणात केली जात असावीत.

निसर्गाचे मनोहारी रूप न्याहाळावे ते श्रावणातच. डोंगरमाथ्यावर कृष्णवर्णीय मेघांची दाटी झालेली, पावसाचे वातावरण आणि कुठून लबाड वारा येतो आणि ढगांना दूरवर पिटाळत पुन्हा क्षितिजावर येतो. पुन्हा खेळ सुरू होतो ऊन-पावसाचा. क्षितिजावर सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मखर उभारून प्रकाशकिरणांची जादुगिरी सुरू असते. भूतलावर स्वर्ग पाहायचा असेल तर श्रावणात निसर्गाला गाठावे, त्याच्याशी चार गुजगोष्टी कराव्यात.

जीवनातील संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. शांत तळ्याकाठी हिरवी झाडी, क्षितिजावर निळ्या-जांभळ्या रंगांची दाटी, दरीत पडणारे धबधब्याचे दुधासारखे जल, पाण्याचा रोरावणारा आवाज, नदीतील पाण्याला आलेला वेग हे पाहण्यात मोठी मौज आहे. सृष्टीच्या या खेळातून सर्वांग प्रफुल्लित होते, अंगात नवीन, सकारात्मक विचारांचा प्रवाह वाहतो. जणू अंगी धबधबा कोसळत असतो, चैतन्य वाहत असते.

मन वेडे पावसात चिंब न्हाते, फुलांचे गंधाळणे मज धुंद करते. त्या शीतल वाऱ्याच्या लहरी अंगाअंगावर रोमांच निर्माण करतात आणि मी श्रावणातील झाडावर झोके घेतो श्रावणात मनही चिंब भिजले आहे. हे सखे, तू या जीवनाच्या प्रवाहात साथ दे, सुख-अमृताची बरसात कर, असे मन प्रियेला सांगण्यास आतुरले आहे. वाऱ्याच्या दूतासंगे प्रियेला हा निरोप.

ऋतूंचा राजा श्रावण तुझी वाट पाहात आहे. तलावांत डुंबत असलेले राजहंस, कमळेही फुलली आहेत, मंदिराशेजारील औदूंबर साधनेत मग्न, फुलांना घाई दत्तात्रेयांच्या पायाशी, पाखरांनी आराधना करण्यास सुरुवात केली आहे. माहेराला आलेल्या पोरी-बाळी सासर विसरून झिम्मा-फुगडी खेळत आहेत. त्यांच्यासाठी निसर्गाने एवढी आरास केली आहे. माळावर वारुळातील नागोबादादा लाह्यांची वाट पाहात आहे. श्रावण असा सजूनधजून आपल्या स्वागतासाठी तयार आहे.

Tags: MAHARASHTRApuneShravan 2021shravan speshal

शिफारस केलेल्या बातम्या

अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात भाजपचा  मुख्यमंत्री असते – उद्धव ठाकरे
Top News

अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असते – उद्धव ठाकरे

26 mins ago
उपमुख्यमंत्री पदामुळे फडणवीस नाखूष? सोशल मीडियावरील प्रोफाईल मुळे रंगली चर्चा…
Top News

उपमुख्यमंत्री पदामुळे फडणवीस नाखूष? सोशल मीडियावरील प्रोफाईल मुळे रंगली चर्चा…

2 hours ago
“पुजारी दुसऱ्याला केलं कारण आपल्याला देव व्हायचंय यालाच राजकारण म्हणतात”
Top News

“पुजारी दुसऱ्याला केलं कारण आपल्याला देव व्हायचंय यालाच राजकारण म्हणतात”

3 hours ago
प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला,‘बिचारे देवेंद्र फडणवीस…’
Top News

प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला,‘बिचारे देवेंद्र फडणवीस…’

4 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असते – उद्धव ठाकरे

#Breaking माझ्या पाठीत खंजीर खुपसला मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका : उद्धव ठाकरे

उपमुख्यमंत्री पदामुळे फडणवीस नाखूष? सोशल मीडियावरील प्रोफाईल मुळे रंगली चर्चा…

मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास : संजय राऊत

शिवसेनेनं पुन्हा ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार, कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

छत्रपती संभाजीराजेंच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना हटके शुभेच्छा ; मराठा समाजाच्या प्रश्नांची करून दिली आठवण

“पुजारी दुसऱ्याला केलं कारण आपल्याला देव व्हायचंय यालाच राजकारण म्हणतात”

विधानसभेचं विशेष अधिवेशन पुढे ढकललं! रविवारी अध्यक्षपदाची निवड होणार

अजबच ! ‘या’ देशात मूल जन्मल्याबरोबर एक वर्षाचे होते, रात्रभर पंखा न लावताच झोपतात इथली माणसे

Most Popular Today

Tags: MAHARASHTRApuneShravan 2021shravan speshal

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!