मुंबई – अभिनेत्री श्रद्धा कपूरचे सेलिब्रिटी फोटोग्राफर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत ब्रेकअप झाल्याच्या बातम्या कालपासून फिरत आहेत. दोघेही 4 वर्षे एकत्र होते. पण आता ते वेगळे झाल्याचे कळत आहे. यानंतर दोघांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यानंतर मात्र अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
ब्रेकपच्या बातम्या समोर आल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘आणखी ऐकवा….’ असं लिहिले आहे. तर एका वेब पोर्टलने रोहनला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रोहनने, ‘मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल काही बोलायचं नाही…’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रद्धा आणि रोहन हे बालपणीचे मित्र आहेत, त्यांच्या कुटुंबातही एकमेकांशी चांगले नाते आहे. श्रद्धा आणि रोहन गेल्या 4 वर्षांपासून डेट करत होते. मात्र त्यांनी कधीही त्यांचे नाते अधिकृत केले नाही. दोघे अनेकदा डिनर डेटवर एकत्र दिसले. इंटरनेटवर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही आल्या होत्या, मात्र आता शहनाईचा आवाज येण्याआधीच दोघे वेगळे झाले आहेत.