बंगळुरू – दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची बंगळुरूमध्ये पुनरावृत्ती घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे २० तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात शनिवारी (दि. २१ सप्टेंबर) ही घटना उघडकीस आली.
महालक्ष्मी दास असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय महालक्ष्मी नावाची तरुणीचा खून झाला आहे. तिच्या पतीचे नाव हेमंत दास आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ती एकटीच राहत होती.
सदर खून १५ दिवसांपूर्वीच झाला असून महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे करून १६५ लीटरच्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी याची माहिती महालक्ष्मीच्या नातेवाईकांना दिली. त्यांनी येऊन पाहिल्यानंतर सदर प्रकार उजेडात आला. व्यालिकवल पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.