नवी दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याच्या जामीन अर्जावर आज दिल्लीतील न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आफताबच्या जामीन याचिकेवर सुनावणीसाठी 22 डिसेंबर ही पुढील तारीख निश्चित केली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी आफताबने त्याच्या वकिलाला दिल्ली न्यायालयात जामीन अर्ज दाखल करू दिला नव्हता. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांनी, जामीन अर्ज चुकून दाखल झाल्याची माहिती पूनावालाकडून ईमेलद्वारे मिळाली. ज्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली, असे सांगितले.
आफताब पूनावाला यांच्या वकिलाने,”अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी 22 डिसेंबरला या याचिकेवर सुनावणी करू शकतात. या प्रकरणातील प्राथमिक तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल व्हायचे आहे, त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे कारण नाही, असे म्हटले. 9 डिसेंबर रोजी पूनावाला यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली
दरम्यान, श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी मीरा-भाईंदर-वसई विरारचे नवे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेतली, तसेच त्यांच्या मुलीच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. विकास वालकर यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह पांडे यांचीही भेट घेतली. ही बैठक सुमारे 40 मिनिटे चालली. या मुद्द्यावर विकास वालकर यांनी 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मीडियासमोर त्यांनी पूनावालाच्या फाशीची मागणी केली. तसेच आरोपींच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणीही केली.