Shraddha walkar murder case: देशभर चर्चेत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आपली हत्या होणार हे श्रद्धाला 2020 मध्येच समजलं होतं. यासंबंधीत एक पत्र समोर आले आहे. पत्रानुसार आफताबपासून जीवाला धोका असल्याची तक्रार श्रद्दानं 2020 मध्येच केली होती. यात आफताब गळा दाबून मारण्याची आणि मृतदेहाचे तुकडे करण्याची धमकी देत असल्याचे या तक्रारीत नमूद आहे.
आफताबच्या कुटुंबालाही याची माहिती होती, असंही श्रद्धानं या पत्रात लिहीले आहे. मात्र ही तक्रार दाखल केली, त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आफताबला केवळ समज दिली होती. त्यानंतर श्रद्धाने काही काळानंतर ही तक्रार मागे घेतली होती. 2020ला श्रद्धा वालकर हिने जिवाला धोका असल्याचे पत्र महाराष्ट्राच्या पोलीसांना लिहीले होते.
याचप्रकरणी आरोपी आफताबचे एक चॅट समोर आले आहे. श्रद्धा आणि त्याच्या कॉमन मित्रासोबतचे हे इन्स्टाग्राम चॅट आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर चार महिन्यांनंतरचे हे चॅट आहे. चॅटमध्ये श्रद्धाबाबत काहीच माहिती नसल्याचे आफताब मित्राला भासवतोय. दोघांमध्ये जवळपास 17 मिनिटांचं संभाषण होतं.
यात श्रद्धा कुठे आहे? हे आपल्याला माहिती नाही असेच भासवण्याचा आफताब प्रयत्न करत होता. मे महिन्यात आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. मात्र श्रद्धा आपल्याला सोडून गेल्याचे आफताब या मित्रांना भासवत होता. आफताब आणि श्रद्धाच्या या कॉमन मित्राने हे चॅट आता पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी त्याचा जबाबही नोंदवला आहे.