नवी दिल्ली – श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आरोपी आफताब याच्याविरुद्ध युक्तिवाद केला. पोलिसांनी आरोपी आफताबला साकेत न्यायालयात हजर केले. श्रद्धाचे वडील विजय वालकर हे देखील यावेळी उपस्थित होते. दिल्ली पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनेक पुरावे सादर केले असल्याचे समजते.
आफताबच्या उपस्थितीत कोर्ट रूममध्ये ऑनलाइन समुपदेशनाचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंगही चालले. श्रद्धाला रेकॉर्डिंगमध्ये “तो माझी शिकार करेल, मला शोधेल आणि मला मारेल” असे म्हंटल असल्याचे समोर आले आहे. एका रेकॉर्डिंगमध्ये, ती डॉक्टर यांच्यासमोर कबूल करत होती की एके दिवशी आफताबने तिचा गळा दाबून धरला होता. “मी पूर्णपणे बेशुद्ध पडले आणि श्वास घेऊ शकत नव्हते असं श्रद्धा म्हणाली असल्याचे रेकॉर्डिंगमध्ये समोर आले.
साकेत न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांनी दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी केलेल्या सबमिशनला उत्तर देण्यासाठी कायदेशीर दुसऱ्या बाजूच्या वकिलांना वेळ दिला. पुढील युक्तिवादासाठी याची सुनावणी २५ मार्चला ठेवण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत दिलेल्या तक्रारीत श्रद्धाने आफताबवर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता.तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करून तिचे तुकडे करण्याची धमकी देण्यात आल्याचे देखील तिने सांगितले होते.
हा पुरावाही सादर केला
एसपीपीने हाडे, जबड्याचे अवशेष आणि फ्रिजमधील रक्तासह कपाट आणि इतर ठिकाणचे रक्त सॅम्पल दिले. डीएनएद्वारे त्याची ओळख पटली. दिल्ली पोलिसांनी रेफ्रिजरेटर, आरी ब्लेड, पाणी, क्लिनर आणि अगरबत्ती खरेदी केल्याचा पुरावाही सादर केला.