श्रद्धा कपूरच्या आगामी “चालबाज इन लंडन’चा टीजर आउट…

श्रद्धा कपूरने शुक्रवारी आपल्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली. “चालबाज इन लंडन’ असे या सिनेमाचे नाव आहे. 1989 साली श्रीदेवीचा डबल रोल असलेल्या “चालबाज’ हा रिमेक असणार आहे. श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या या नव्या सिनेमाचा एक टीजरदेखील पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

“ना जाने कहा से आई है’ या गाण्याचा हा टीजर आहे. “चालबाज इन लंडन’मध्ये श्रद्धा कपूरचा डबल रोल असणार आहे, हे उघड आहे मूळ “चालबाज’मध्ये श्रीदेवी बरोबर सनी देओल आणि रजनीकांत हे हिरो होते, तर “चालबाज इन लंडन’मध्ये कोण हिरो असणार आहेत, हे समजू शकलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

“चालबाज’ची गाणीही तितकीच श्रवणीय होती. तशीच “चालबाज इन लंडन’ची गाणीही श्रवणीय असतील. अर्थात यावेळी भारतात आणि लंडनमध्ये दोन्हीकडे शूटिंग होणार असेल. तसे सिनेमाच्या नावावरूनच लक्षात येते. ‘चालबाज’ हादेखील 1973 सालचा “सीता और गीता’ या हेमामालिनीचा डबल रोल असलेल्या पिक्‍चरचा रिमेक होता. आता जुळ्या बहिणींच्या थीम वरील तिसरा पिक्‍चर श्रद्धा कपूर घेऊन येते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.