श्रद्धा कपूरचा “स्त्री’ चित्रपट जपानमध्ये होणार रिलीज

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा बहुचर्चित “स्त्री’ चित्रपट आता जपानमध्ये रिलीज होण्याच्या तयारीत आहे. श्रद्धानेही रोमांचक वृत्त आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावर एक कप्शॅन शेअर करत दिली आहे. तिने पोस्ट केले की, “स्त्री’ जपानमध्ये रिलीज होण्यास सज्ज आहे. आपणही सज्ज राहा.

भारतामध्ये “साहो’ चित्रपटानंतर प्रदर्शित झाल्यानंतर “स्त्री’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रद्धा कपूरच्या चित्रपटाने भारतीय सीमा ओलांडत आता वैश्‍विक चित्रपटांच्या सूचित स्थान मिळविण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. या चित्रपटाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली असल्याची माहिती श्रद्धाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली होती.

या चित्रपटातील “मिलेगी मिलेगी’ हे गाणे खूपच हिट ठरले होते आणि यातील श्रद्धाच्या अनोख्या मुव्हीजने सर्वांची मने जिंकली होती. यात तिच्यासोबत राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

विशेष म्हणजे, बॉलीवूडमधील हॉरर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारणारी श्रद्धा कपूर ही पहिली अभिनेत्री आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ती सध्या रणबीर कपूरसोबत लव रंजन दिग्दर्शित आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.