Stree 2 Film | अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा ‘स्त्री 2’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ‘स्त्री 2’ हा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. राजकुमार राव-श्रद्धा कपूर यांचा ‘स्त्री 2’ सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज झाला होता.
या चित्रपटाला रिलीज होऊन 35 दिवस पूर्ण झाले आहे. आता या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली आहे. याआधी या यादीत शाहरुख खानचा ‘जवान’ सिनेमा टॉपला होता. Stree 2 Film |
View this post on Instagram
आता ‘स्त्री 2’ जवानला मागे टाकत सर्वात जास्त कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाने ‘जवान’सह ‘पठाण’, ‘अॅनिमल’, ‘गदर 2’, ‘केजीएफ 2’ आणि ‘बाहुबली 2’ यांना मागे टाकले आहे. Stree 2 Film |
‘स्त्री 2’ने भारतात 586 कोटींची कमाई केली आहे. तर जवानने 583 कोटींचा देशांतर्गत गल्ला जमवला होता. याचे जगभरातील कलेक्शन 1160 कोटी रुपये आहे. ‘स्त्री 2’चे देशांतर्गत एकूण कलेक्शन 668.75 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाने परदेशात 130 कोटींची कमाई केली आहे.