Shraddha Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर उत्तम अभिनयासह आपल्या साधेपणामुळे चाहत्यांच्या पसंतीस पडते. सोशल मीडियावर सध्या श्रद्धाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यातील तिच्या कृतीने नेटकरी भारावून गेले.
व्हायरल व्हिडीओमध्ये श्रद्धा एका कार्यक्रमाला गेली असताना एक महिला तिला केक भरवत आहे. तेव्हा श्रद्धा त्यातील थोडा केक घेते आणि बाकीचा त्या महिलेला भरवते. तसेच शेवटी ती हात जोडून त्या महिलेला थँक्यू देखील बोलते. तसेच जाताना ती या महिलेची गळाभेटही घेते.
हे पाहून सर्वच भारावून गेले आहेत. श्रद्धाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. श्रद्धाच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहे. श्रद्धाच्या या नम्रपणाचं आणि साधेपणाचं सध्या कौतुक केले जात आहे.
View this post on Instagram
श्रद्धाचा नुकताच ‘स्त्री 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या सिनेमातील श्रद्धाच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं. लवकरच ‘स्त्री 3’ सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अमर कौशिक या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा:
आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री विक्रांत मेस्सीसोबत झळकणार