मुंबई – अलीकडेच श्रद्धा कपूर एका सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईत आली असताना स्टुडिओच्या बाहेर मोबाइलवर चॅटिंग करत होती. तेव्हा काही पापराझींनी तिचे फोटो काढले आणि व्हायरल केले होते.
या फोटोंबरोबर पापराझींनी श्रद्धा कपूरचा पर्सनल चॅटदेखील लीक करून टाकला. या व्हॉटस ऍपमध्ये श्रद्धा कोणा खास व्यक्तीबरोबर काहीतरी गप्पा करत होती. श्रद्धाने या खास व्यक्तीचा नंबर त्याच्या नावाने सेव्ह केलेला नव्हता.
तिने या व्यक्तीचा नंबर केवळ 3 हार्ट इमोजींनी सेव्ह केलेला आहे. “मी आतापर्यंत कधीही तुझ्यासारख्या व्यक्तीला भेटलेली नाही.’ असे तिने म्हटले आहे. त्यावर समोरच्या व्यक्तीने “तू माझ्याबाबत असा विचार करतेस हे किती चांगले आहे.’ असे उत्तर दिले आहे.
त्यावर श्रद्धाने माझ्या सर्व आकांक्षा पूर्ण केल्याबद्दल थॅंक्यू असे म्हटले आहे. समोरच्या व्यक्तीनेही हार्ट इमोजी काढून श्रद्धाला रिप्लाय दिला आहे. मात्र, या सगळ्या व्हॉटस् ऍप चॅटवरून हा श्रद्धाचा अगदी खासगी मामला असल्याचे स्पष्ट होते आहे.
हा चॅट लीक केल्याबद्दल नेटकऱ्यांनी पापराझींना ट्रोल केले आहे. हे सगळे एडिटेड असेल तर हा खूप वाईट विनोद आहे, असे नेटकऱ्यांनी सुनावले आहे.