श्रद्धा कपूरबाबत तसे फार गॉसिप ऐकायला मिळत नाही. मात्र, सध्या लव्ह लाईफबाबत तिच्याविषयी खूप बोलले जात आहे. तिच्या “स्ट्रीट डान्सर’ची क्रेझ आतापासून युवकांमध्ये निर्माण झाली आहे. याच सिनेमामुळे तिच्याबाबत गॉसिप वाढले आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाबरोबर तिचे सूत जुळले असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. गेल्या वर्षभरात बऱ्याच इव्हेंटमध्ये हे दोघे एकत्र दिसले होते.
त्यांच्या लग्नाच्या अफवाही सोशल मीडियावर पसरायला लागल्या आहेत. आतापर्यंत तिने या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती, पण आता तिने गप्प बसायचे नाही, असे ठरवले आहे. या सगळ्या अफवा आहेत, असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे. सध्या मी इतकी कामात व्यस्त आहे, की रिलेशनशीपसाठी आपल्याजवळ वेळच नाही, असेही तिने सांगितले आहे.
श्रद्धा आपल्या करिअरबाबत खूपच सिरीयस आहे.
आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी ती खूप परिश्रम घेते आहे. श्रद्धा आणि रोहन यांच्यातील रिलेशनशीपबाबतच्या अफवांना पहिल्यांदाच कोणीतरी उत्तर दिले आहे. “स्ट्रीट डान्सर’व्यतिरिक्त श्रद्धा आणि टायगर श्रॉफ “बागी 3’मध्ये असणार आहेत. याशिवाय लव रंजनच्या आगामी सिनेमात ती रणवीर सिंह बरोबर असणार आहे.