श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ आपल्या आगामी “बागी-3′ चित्रपटाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीमसह सर्बियाला दाखल झालेले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ सप्टेंबरपासून करण्यात आला असून चित्रपटातील काही हाय ऍक्शन सीन्स करण्यासाठी फॉरेन लोकेशनवर पोहोचली आहे.
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेड्यूल निश्चित केले असून ते वेळेत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, सध्या सर्बियात कडाक्याची थंडी पडलेली असल्याने स्टार्सला हीटर्सचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरने सेटवरील एक फोटो शेअर करत त्याची थोडीशी झलक दाखविली आहे. यात ती टीम मेंबरसोबत एक मॉन्युमेंटसमोर पोज देताना दिसते.
दरम्यान, “बागी’नंतर श्रद्धा आणि टायगर यांचा “बागी-3’मध्ये रीयूनियन होत आहे. यात रितेश देशमुख, अंकिता लोखंडे, आशुतोष राणा यासारखे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी मार्चमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.