श्रद्धा कपूरने प्रियंका चोप्राला इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत टाकले ‘मागे’

Shraddha Kapoor । स्त्री २ अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडिया फॉलोअर्सच्या बाबतीत श्रद्धाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आणि अभिनेत्री प्रियांका चोपडाला मागे टाकले आहे. श्रद्धा कपूर इंस्टाग्रामवर दुसरी सर्वात जास्त फॉलो करणाऱ्या भारतीयांपैकी एक ठरली आहे. फॉलोवर्सच्या बाबतीत क्रिकेटर विराट कोहलीनंतर श्रद्धा कपूरचा नंबर लागतो. श्रद्धाची स्त्री २ चित्रपटामुळेही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
२ ० २ ४ श्रद्धासाठी खूप लकी मानला जात आहे. इंस्टाग्रामवर २ ४ तारखेला देशी गर्ल प्रियंकाचे 91.8 मिलियन फॉलोअर्स होते. तर श्रद्धाचे 91 .9 मिलियन फॉलोअर्स होते. स्त्री २ नुकताच रिलीज झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात या चित्रपटामुळे तिचे इंस्टाग्रामवरील फॉलोवर्स वाढले असल्याचा अंदाज लावला जात आहे. फॉलोवर्सचा एकदा वाढत गेले तर लवकरच श्रद्धाचा १ ० ० मिलियन फॉलोवरच्या क्लबमध्ये समावेश होईल.
विराट कोहलीचे २ ७ ० मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तो सर्वात जास्त चाहता वर्ग असलेला पहिला भारतीय आहे. तर श्रद्धा आणि प्रियंका नंतर पंतप्रधान मोदी असे क्रमवारी आहे
तर आलिया भट्टचे 85.2 मिलियन फॉलोवर्स असून ती पाचव्या स्थानावर आहे. त्यानंतर कैटरीना कैफ (80.4 मिलियन), दीपिका पादुकोण (79.9 मिलियन) आणि नेहा कक्कड़ (78.7 मिलियन) आहे
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, हॉरर कॉमेडी ‘स्त्री 2’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामे करत आहे. लवकरच श्रद्धा ‘चालबाज इन लंदन’ आणि ‘चंदा मामा दूर’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिच्या हातात अनुराग बसूचा चित्रपट आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी देखील दिसणार आहेत.





