मुंबई – अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर नेहमी तिच्या पोस्ट शेअर करत असते. या पोस्टमुऴे ती नेहमी चर्चेत असते. नुकताच श्रद्धाच्या बॉडीगार्डचा वाढदिवस झाला, त्याला शुभेच्छा देतानाचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिने चक्क मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अतुल कांबळे असे तिच्या बॉडीगार्डचे नाव आहे. श्रद्धाच्या या कृतीने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. या पोस्टवरून श्रद्धा तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीची किती काळजी घेते हे दिसून येत आहे अशा प्रकारचे रिप्लाय तिचे चाहते या पोस्टवर तिला करत आहेत.
तिने पोस्टमध्ये शुभेच्छा देताना म्हटलय की “माझ्या आयुष्यातील महत्वाच्या आणि अप्रतिम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला नेहमी सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. अतुल, तुझ्या सारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात असण याला मी माझ भाग्य मानते. तुला सुख, शांती आणि तुला जे हव ते सर्व काही लाभो! आय लव्ह यू. हैप्पी बर्थडे!!!”, अस तिने अतुलसाठी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामध्ये ती अतुलसोबत केक कापताना दिसत आहे.
दरम्यान, श्रद्धाचे आगामी स्ट्रीट डान्सर, आणि बागी 3 चित्रपट येणार आहेत. सध्या ती या दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.