बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर काही वर्षांत आपल्या जबरदस्त अभिनयाने सतत प्रसिद्धी मिळवित आहे. एवढेच नव्हे, तर तिने आज इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्स ओलांडल्यामुळे सोशल मीडियावर एक नवीन कामगिरी केली आहे.
यापूर्वी इंस्टाग्रामवर दीपिका पादुकोणचे 50 मिलियन फॉलोअर्स होते. श्रद्धाने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले यात काही शंका नाही. यामुळे इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स वेगाने वाढत आहेत. इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्स झाल्यामुळे श्रद्धा कपूर खूप खूश आहे. ती इंडस्ट्रीमधील सर्वात मेहनती आणि अष्टपैलू अभिनेत्री आहे. श्रद्धा “गर्ल नेक्स्ट डोअर’चे एक उत्तम उदाहरण आहे.
श्रद्धाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास ती अखेर “बागी 3′ चित्रपटात झळकली होती. यात तिने टायगर श्रॉफच्या अपोजिठ रोल साकारला होता. चित्रपटातील तिच्या अभिनायाचे खूपच कौतुक झाले होते.
याशिवाय गेल्या वर्षी सुपरस्टार प्रभासच्या “साहो’ या चित्रपटाद्वारे तिने दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले होते. यामध्ये तिचा ऍक्शन अवतार दिसला होता. मात्र, 350 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळाले नाही.