Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने ‘गदर 2’ आणि ‘जवान’चे रेकॉर्ड तोडले आहेत. मात्र श्रद्धा तिच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. मागील काही दिवसांपासून लेखक राहुल मोदीसोबत तिचे नाव जोडल जात होते. आता एका मुलाखतीत श्रद्धाने तिचं रिलेशनशिप ‘कन्फर्म’ केलं आहे.
मुलाखतीदरम्यान श्रद्धाने कोणाचेही नाव घेतले नाही पण ती म्हणाली, “मला माझ्या जोडीदारासोबत वेळ घालवणे आणि त्याच्यासोबत चित्रपट पाहणे, रात्रीच्या जेवणासाठी किंवा प्रवासाला जाणे खूप आवडते. मी सहसा अशी व्यक्ती आहे जी पार्टनरसोबत एकत्र वेळ घालवण्यास पसंती देते. उदाहरणार्थ, माझ्या शाळेतील मित्रांसोबतही, जर आम्ही भेटलो नाही, तर त्याचा माझ्या मूडवर परिणाम होतो. कालच आम्ही सर्व कुटुंबीयांनी मिळून एकत्र जेवण केलं. अशा गोष्टींमुळे मनात खूपच सकारात्मक भावना येते. हेच रिलेशनशिपच्या बाबतीत लागू होते.” Shraddha Kapoor |
लग्नाच्या प्रश्नावर श्रद्धा म्हणाली, “लग्नसंस्थेवर विश्वास असणं किंवा नसणं ही गोष्ट नाही. तर तो योग्य व्यक्ती असण्याची आहे आणि म्हणूनच माझ्यासाठी योग्य व्यक्तीसोबत असणं फार महत्त्वाचं आहे. जर कोणाला वाटत असेल की त्यांना लग्न करायचं आहे तर ते खूप छान आहे. पण जर त्यांना वाटत असेल की त्यांना लग्न करायचं नाही तर तीही चांगली गोष्ट आहे. ” Shraddha Kapoor |
श्रद्धाला अनेकदा राहुल मोदीसोबत डिनर डेटवर स्पॉट करण्यात आले आहे. राहुल ‘तू झुठी में मक्कर’चा लेखक आहे आणि चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोघे भेटले होते. त्यानंतर ‘स्त्री 2’ रिलीज होण्यापूर्वीच श्रद्धा आणि राहुलचे ब्रेकअप झाल्याचीही अफवा पसरल्या होत्या.
हेही वाचा:
झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई ; मनी लाँड्रिंग प्रकरणात 20 हून अधिक ठिकाणी छापे