Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री-2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. हा वर्ष 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा हिंदी चित्रपट ठरला. स्त्री-2 च्या यशानंतर आता श्रद्धा मुंबईतील लग्झरी अपार्टमेंटची मालकीण झाली आहे. तिने वडील शक्ती कपूर यांच्यासोबत मिळून कोट्यावधीची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर यांनी 6.24 कोटी रुपये खर्चून लग्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्यांनी पिरामल महालक्ष्मी साउथ टॉवरमधील अपार्टमेंट खरेदी केले असून, 13 जानेवारीला याची नोंदणी झाली. हा टॉवर रेस कोर्स आणि सी-व्ह्यूसाठी लोकप्रिय असून यामध्ये 2BHK आणि 3BHK फ्लॅट आहे. श्रद्धाचे अपार्टमेंट 1042.73 चौरस फूट असून, यात दोन बाल्कनी देखील आहे. श्रद्धाने प्रति चौरस फुटासाठी तब्बल 59,875 रुपये मोजले आहेत.
श्रद्धाने काही महिन्यांपूर्वीच जुहू येथे रेसिडेंशियल टॉवरमध्ये एक लग्झरी अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. 1 वर्षांसाठी भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटचे भाडे 6 लाख रुपये प्रति महिना आहे. या घरासाठी तिने 72 लाख रुपये अॅडव्हान्स दिले होते. त्यामुळे आता श्रद्धा या घरातून तिच्या नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होण्याची शक्यता आहे.
श्रद्धाने दीड वर्षापूर्वी जवळपास साडे चार कोटी रुपये खर्चून लॅम्बोर्गिनी हुराकन टेक्निका कार खरेदी केली होती. त्यामुळे श्रद्धा आता लग्झरी कारपाठोपाठ लग्झरी अपार्टमेंटची देखील मालकीण झाली आहे.
श्रद्धाच्या कामाबद्दल सांगायचे तर तिचा स्त्री-2 हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. अभिनेत्री ‘नागिन’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने निर्माते निखिल द्विवेदी यांनी इंस्टाग्राम स्टोरीजवर “नागिन” च्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला होता.