“रामायण’मध्ये सीताच्या भूमिकेत श्रद्धा कपूर?

बॉक्‍स ऑफिसवर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा नुकताच “साहो’ आणि “छिछोरे’ चित्रपटाला चांगले यश मिळाले. या चित्रपटातील श्रद्धाच्या अभिनयाला चाहत्यांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर आता श्रद्धा कपूर काही ठराविक चित्रपटातील भूमिका स्वीकारताना दिसते. श्रद्धा कपूरला डायरेक्‍टर लव रंजन यांच्या दिग्दर्शनाखालील आगामी चित्रपटाची ऑफर होती. ज्यात रणबीर कपूर आणि अजय देवगन मुख्य भूमिका साकारणार आहेत.

मात्र, श्रद्धाने हा चित्रपट नाकारल्याचे समजते. हा चित्रपट तिने नितेश तिवारी यांच्या “रामायण’ चित्रपटासाठी सोडल्याचे कळते. या मल्टी-स्टारर चित्रपटात श्रद्धा ही “सीता’ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 600 कोटी रुपये आहे. या चित्रपटात श्रद्धाने खूपच उत्साह दाखविला आहे. श्रद्धाचा नुकताच प्रदर्शित झालेल्या “छिछोरे’ चित्रपटाचे दिग्दर्शनही नितेश तिवारी यांनी केले आहे.

दरम्यान, श्रद्धाने आपल्या आगामी “स्ट्रीट डान्सर 3डी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून यात तिच्यासोबत वरुण धवन झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले असून यात प्रभुदेवा, नोरा फतेही, अपारशक्‍ति खुराना आणि शक्‍ति मोहन आदी कलाकारांची मोठी फौज आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.