बॉलिवुडमधील सक्सेसफुल कलाकारांपैकी श्रद्धा कपूर हे एक नाव आहे. आज तिच्याकडे अनेक मोठमोठया चित्रपटांच्या ऑफर असून दिग्गज निर्माता-दिग्दर्शकही तिच्यासोबत काम करण्यासाठी इच्छूक आहेत. पण हे यश श्रद्धाला सहज मिळाले नाही. एक स्टार किड असताना देखील तिला खूप संघर्ष करावा लागला. हा संघर्ष मानसिकही होता. कारण श्रद्धा ही अनेक वर्षांपासून एका डिसऑर्डरने पिडित आहे?
एका कार्यक्रमावेळी दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा म्हणाली होती की, मला ऐंग्जाइटी काय आहे हे माहित देखील नव्हते. याबाबत मला 2013मध्ये “आशिकी-2′ चित्रपटातून समजले. मला प्रत्येक क्षणी शरीरातील काही ठिकाणी त्रास जाणवत होता. पण कोणत्याही प्रकारचे लक्षण जाणवत नव्हते.
यासाठी मी बरेचसे मेडिकल टेस्ट देखील केल्या. परंतु डॉक्टरच्या रिपोर्टमधून काहीही निष्पन्न होत नसे. हे माझयासाठी खूपच विचित्र असे होते. कारण मला सतत त्रास होणारा त्रास कमी होत नव्हता. त्यानंतर मी ऐंग्जाइटी पिडित असल्याचे समजले. परंतु यावर मी एक यशस्वी उपाय शोधला आहे. लोकांनी याचा स्वीकार केला पाहिजे की ते ऐंग्जाइटी पीडित आहेत. त्याला प्रेमाने दूर केले जावू शकते, असे श्रद्धाने सांगितले.
दरम्यान, प्रफेशनल फ्रेटबाबत बोलायचे झाल्यास श्रद्धा कपूरचे नुकतेच “साहो’ आणि “छिछोरे’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले असून बॉक्स ऑफिसवर त्याला चांगले यश मिळत आहे. याशिवाय ती “स्ट्रीट डान्सर 3डी’ आणि “बागी-3′ या चित्रपटात झळकणार आहे.