श्रद्धा बनली फोटोग्राफर

शक्‍ती कपूर यांची कन्या श्रद्धा कपूरने सिनेसृष्टीत अभिनयाबरोबरच नृत्य, गायन या क्षेत्रातही आपली चमक दाखवली आहे. अलीकडेच श्रद्धामधील आणखी एका कौशल्याचा प्रत्यय आला. वरुण धवन आणि श्रद्धा मुंबईमध्ये “बाला’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आले होते.

तिथेदोघांच्याही फॅन्सनी गर्दी केली होती. या स्क्रिनिंगदरम्यान वरुणच्या एका चाहत्याने त्याच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्‍त केली. तेव्हा श्रद्धाने लगेचच त्या चाहत्याचा डिजिटल कॅमेरा घेऊन वरुणचा आणि त्याचा फोटो काढला.

हा फोटोउगाचच क्‍लिक करुन काढला नाही; तर एखाद्या व्यावसायिक छायाचित्रकाराप्रमाणे श्रद्धाने हे फोटो काढले. श्रद्धाला फोटो काढतानाचे क्षण अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. नुकतेच ते सोशल मीडियावर व्हायरलही झाले. मग काय श्रद्धाच्या याही कौशल्याची प्रशंसा होऊ लागली. श्रद्धा सध्या “स्ट्रीट डान्सर 3 डी’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.