मुंबई – टीव्ही इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री श्रद्धा आर्या नेहमीच तिच्या अप्रतिम लुक्सने चाहत्यांची मने जिंकते. या टीव्ही अभिनेत्रीचा प्रत्येक पोशाख इतका प्रेक्षणीय आहे की लोक तिच्यासाठी वेडे होतात.श्रद्धा उगाच बोल्डपणा दाखवण्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी कधीच आपलं ड्रेसिंग करत नाही. केवळ सुंदर दिसण्यासाठी श्रद्धा चांगले स्टायलिश कपडे घालत असते.
नुकतंच श्रद्धा आर्या तिच्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी पोहोचली, तेव्हा तिचा बोल्ड अंदाज पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सध्या श्रद्धा मित्रांसोबत जोरदार एन्जॉय करत आहे. तिने काही फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती अप्रतिम पोजमध्ये दिसत आहे. या पार्टीत तिने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता, ज्यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत होती.
श्रद्धा आर्याच्या ड्रेसच्या वरच्या बाजूला कॉर्सेट पॅटर्न तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. तिचा पांढरा मिडी आउटफिट स्ट्रॅपलेस होता, जो तिच्या लुकला उत्तम प्रकारे पूरक होता. श्रद्धाचा हा लूकही चाहत्यांना चांगलीच भुरळ घालत आहे.
थाई-हाय स्लिटच्या या ड्रेससोबत अधिक सुंदर दिसण्यासाठी श्रद्धाने ब्लू पेंडेंट डायमंड चेन घातली होती.उगाच बोल्ड दिसण्यासाठी ड्रेस घालण्यापेक्षा आपली सुंदरता वाढवणारा ड्रेस घातल्याबद्दल अनेक चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तर तिला कोणता चित्रपट करतेय ? असा सवाल देखील विचारला आहे.