धनगर आरक्षण लढ्यातून सरकारला ताकद दाखवा : माने

गोंदवले – महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी राजकीय पक्षीय मतभेद बाजूला ठेवून दि. 27 रोजी ला महाड येथून सुरू होत असलेल्या धनगर आरक्षण लढ्यात सामील होवून एकीची ताकद सरकारला दाखवावी, असे आवाहन अशोक माने यांनी केले आहे.

याबाबत माने म्हणाले, आरक्षण मिळाले तरच ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत समाजाला प्रतिनिधित्व मिळणार आहे. तसेच नोकरी व शिक्षणामध्येही हक्काचे आरक्षण लाभणार आहे. जे समाज लढ्यात सामील होणार नाहीत ते समाजासमोर उघडे पडतीलच व समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असेही अशोक माने यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.