ओझर : शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे असे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरीपेंढार येथे केले.
दरम्यान, आदिवासी, मराठा, धनगर, ओबीसी यांचे जातीनिहाय जनगणना करून ५०% पेक्षा जास्त मर्यादा वाढवण्याची प्रयत्न महाविकास आघाडीकडून केले जातील असे आश्वासित करून काशीराम म्हणतात त्यानुसार जिसकी जितनी संख्या भारी उनकी उतनी हिस्सेदारी याप्रमाणे जनगणना मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले.
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांच्या प्रचारा निमित्त पिंपरीपेंढार येथील कोपरा सभेत खा. कोल्हे बोलत होते. या वेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते शरद लेंडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव चौगुले, दादाभाऊ बगाड, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, जि.प.चे.माजी सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, शरद चौधरी, धनंजय डुंबरे, रोहिदास वेठेकर, रोहिदास कुटे, किसनराव कुटे, शिवाजीराव वेठेकर, जयरामशेठ कदम, राजूशेठ वामन, प्रकाश नवले, दत्तात्रेय वेठेकर, सुरेखाताई वेठेकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले कि, पिंपरीपेंढार हे आदर्श गाव आहे. ज्या गावाने स्मशान भूमीला स्वर्ग भूमी केली आहे या गावातील मतदारांनी लोकसभेला ७० टक्के मतदान लोकसभेला केले होते. यावेळी देखील ७० टक्के पेक्षा जास्त मतदान हे सत्यशील शेरकर यांना करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमेदवार सत्यशील शेरकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीच्या पिकाला हमी भाव नाही. शेतकरी, सर्वसामान्य जनता युती सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. आता राज्यात परिवर्तनाची लाट असल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्ण्यासाठी शरदचंद्र पवार , उध्दव ठाकरे, राहुल गांधी यांना देऊन महाविकास आघाडीला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहान त्यांनी केले. यावेळी रोहिदास वेठेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. पिंपरीपेंढार ग्रामस्थांनी खा.डॉ.अमोल कोल्हे, सत्यशील शेरकर यांचे उत्सपुर्त स्वागत केले.