नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसे आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे. भाजपचे अनेक बडे नेते दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. गृहमंत्री अमित शहा, भाजप नेते विनोद तावडे यांनीही दिल्ली प्रचारासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विनोद तावडे यांना टोला लगावला आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले कि, विनोद तावडे हे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आहेत. ज्यांनी राज्यातील १३०० सरकारी शाळा बंद केल्या. ते आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. दिल्लीकरांनों, आपने खूप मेहनत घेऊन सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्ली दाखवा. ते आपले अतिथी आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
विनोद तावड़े जी महाराष्ट्र के पूर्व शिक्षा मंत्री है जिन्होंने 1300 सरकारी स्कूल बंद किए।अब ये दिल्ली में भाजपा का प्रचार करने आए हैं
मेरे दिल्लीवासियों,
आपने खूब मेहनत कर के सरकारी स्कूल शानदार बनाए।इन्हें अपने स्कूल दिखाना, छोले भटूरे खिलाना और दिल्ली दर्शन कराना। वो अतिथि है pic.twitter.com/Vo0KNRwBOf
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 29, 2020
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात विनोद तावडे शिक्षण मंत्री होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र तावडेंचे तिकीट भाजपकडून कापण्यात आले होते.