दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये जोरदार राडा

पोलिसांनी चालवली गोळी, तर वकिलांनी पेटवली गाडी 

नवी दिल्ली : दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. या हाणामारीमुळे परिसरात तणावग्रस्थ वातावरण निर्माण झाले आहे.

पार्किंगच्या वादातून हा प्रकार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या वादात वकिलांनी पोलिसांची एक गाडी देखील पेटून दिली आहे. त्यामुळे तीस हजारी कोर्ट आणि आजूबाजूच्या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधीकारी घटनास्थळावर दाखल होत असून  वरिष्ठांकडून हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु वकिलांचा कुठलाही प्रतिनिधी अद्याप बोलण्यासाठी समोर आलेला नाही.

दरम्यान वाहनाच्या पार्किंग वरून वकील आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादात एका पोलीसाकडून गोळी चालवण्यात आली. ती गोळी एका वकिलांला लागल्याने हा वाद चिघळला असून, त्याने रौद्र रूप धारण केले आहे. गोळी चालवणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वकीलांकडून करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.