नवी दिल्ली: 9 नोव्हेंबर रोजी कर्तारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पाकिस्तानने कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना आमंत्रित केले आहे. दरम्यान, नवजोतसिंग सिद्धू यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पुन्हा पत्र लिहून करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याची परवानगी मिळण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. पत्रात म्हटले आहे की, “शासनाने मला उद्घाटनासाठी पाकला जाण्याची परवानगी दिली आहे की नाही याविषयी वारंवार आठवण करून देऊनही तुम्ही प्रतिसाद दिला नाही”.
पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानी सिनेटचा सदस्य फैसल जावेद खान यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी संपर्क साधून त्यांना ९ नोव्हेंबरला पाकिस्तानला बोलावले आहे.
यापूर्वी सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित दर्शवली होती. दरम्यान, पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांना मिठी मारल्याबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर कडक टीका झाली होती. सिद्धू यांनी त्यांच्या भेटीदरम्यान कर्तारपूर कॉरिडॉरचा मुद्दाही उपस्थित केला होता.
काय आहे कर्तारपूर साहिब कॉरिडोर
पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात डेरा बाबा नानक ते पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ कर्तारपूर साहिब पर्यंत एक कॉरिडोर आहे. यामुळे पाकिस्तानमधील रावी नदीच्या काठावर स्थित गुरुद्वारा करतारपूर साहिब येथे जाणाऱ्या भारतीय शीख भाविकांना मोठ्या प्रमाणात मदत होते. या जागी शिखांचे गुरु नानक देव यांनी आयुष्याची १८ वर्षे घालविली होती. हा कॉरिडोर सुमारे ५ किलोमीटर लांबीचा आहे.
Navjot Singh Sidhu, Congress writes to EAM, S Jaishankar again, requesting permission to attend #KartarpurCorridor inauguration. Letter states,”Despite repeated reminders you haven’t responded to whether or not the govt has granted me permission to go to Pak for the inauguration” pic.twitter.com/HUR9qO6A5b
— ANI (@ANI) November 7, 2019