नवी दिल्ली – कर्नाटकातील हिजाब बंदीबाबत सर्वोच्च न्यायालय आज (गुरुवार ) निकाल देणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचे खंडपीठ हा निकाल देणार आहे.
कर्नाटकातील हिजाब बंदीचा निर्णय योग्य होता की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवायचे आहे. 22 सप्टेंबर रोजी दहा दिवस चाललेल्या सुनावणीनंतर खंडपीठाने हिजाब वादावरील निर्णय राखून ठेवला होता. एकूण 23 याचिकांवर सुनावणी झाली.
हिजाब बंदीला आव्हान देत सहा मुस्लिम विद्यार्थिनींनीही कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय गुरुवारी सकाळी 10.30 वाजता येणार आहे.