मुंबई: राज्यातील सत्तेची गणितं जुळवत असताना नेतेमंडळी एकमेकांवर चांगल्याच आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यातच सध्या ट्विटरवर मांत्रिकाच्या मुद्द्यावर भाजपचे नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलाच कलगी तुरा रंगलेला पाहायला मिळतोय.
सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलार हे मांत्रिकाच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य केलं होत. त्या वक्तव्यावरून हा घ्या पुरावा म्हणत ठाणे राष्ट्रवादीने एक ट्विटकेलं होत. या ट्विट मध्ये आशिष शेलार एका मांत्रिकाचा वेष परिधान केलेल्या व्यक्ती बरोबर उभे असलेले दिसत होते.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवांपूर्वी म्हांटल होत ‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत’ त्याचा पुरावा.@Awhadspeaks @ShelarAshish @NCPspeaks @bjp4mumbai @BJP4Maharashtra pic.twitter.com/YVsNdR41cs
— NCP Thane (@ThaneNCP) November 18, 2019
त्यानंतर आता या राष्ट्रवादीच्या ट्विट वर संबंधित व्यक्तीने स्वतः या फोटोविषयी भूमिका मांडत स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित व्यक्तीचं नाव फिरोज शाकिर आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “मी बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित फॅशन डिझाईनर आहे. मागील 40 वर्षांपासून आशिष शेलार ज्या इमारतीत राहतात तेथेच मीही राहतो. मी तांत्रित नसून एक मुस्लिम फोटोग्राफर आहे याची कृपया नोंद घ्यावी. मी हिंदुत्वात असलेल्या जागतिक शांततेच्या संदेशावर माहितीपट बनवत आहे.”
माझ्या इमारतीमधे राहणाऱ्या एका फँशन डिझाइनरला, फोटोग्राफरला, मांत्रिक ठरवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना “भोंदूबाबा” म्हणावे का? असा प्रश्न पडतो. हास्यास्पदच आहे हे सारे! @Awhadspeaks @ThaneNCP @MiLOKMAT @LoksattaLive @abpmajhatv https://t.co/Z96Cb98Jc9
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019
आशिष शेलार यांनी फिरोज शाकिर यांचं ट्विट रिट्विट करत जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, “माझ्या इमारतीमधे राहणाऱ्या एका फॅशन डिझाईनरला, फोटोग्राफरला, मांत्रिक ठरवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना “भोंदूबाबा” म्हणावे का? असा प्रश्न पडतो. हे सर्व हास्यास्पदच आहे.”
आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात? हा घ्या पुरावा म्हणत राष्ट्रवादीचे ट्विट
जितेंद्र आव्हाड यांनी आपण कोणतंही ट्विट किंवा रिट्विट केलं नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच माझं नाव यात का घेता? असा सवाल आशिष शेलार यांना केला आहे.